हर्सूल परिसरातील बेरी बाग कॉलनीतल्या डीपीला आज सायंकाळच्या सुमारास आग लागली. मुख्य रस्त्यावर असलेल्या डीपी ने अचानक पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. परिसर मात्र काळोखा डुबला आहे. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेरी बाग येथील मुख्य रस्त्यावरील डीपीला अचानक आग लागली. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. वारेही वाहत होते. मुख्य रस्त्यावरील या डीपी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. शॉर्टसर्किट होऊन डीपी ने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. डीपी ने पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. तर परिसरातील जवळपास चार ते पाच वसाहतींचा विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.